Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

 ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी (दि. ११) आशा भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर रविवारी (दि. १२) वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सोमवारी १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे झाला. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या संस्कारातून त्यांनी संगीताचे धडे घेतले. सुरुवातीच्या संघर्षानंतर त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा २० पेक्षा अधिक भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड करून विक्रम प्रस्थापित केला. “पिया तू अब तो आजा”, “दम मारो दम”, “चुरा लिया है तुमने”, “ये मेरा दिल” यांसारखी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. विशेषतः आर.डी बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी भारतीय चित्रपटसंगीताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक ठरली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!