Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai drug case : मुंबई लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग ओव्हरडोसचा कहर; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 5 जण अटकेत

Mumbai drug case : मुंबई लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग ओव्हरडोसचा कहर; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 5 जण अटकेत

Mumbai drug case : मुंबईतील NESCO Center येथे झालेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग ओव्हरडोसची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून आणखी एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

११ एप्रिल रोजी गोरेगावमधील या इव्हेंटमध्ये नशिल्या पदार्थांच्या सेवनामुळे ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी विद्यार्थ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी वनराई पोलीस ठाणे यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये इव्हेंटशी संबंधित एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. १३ एप्रिल रोजी नेस्कोच्या इव्हेंट विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

मृत विद्यार्थ्यांना नेमका कोणता ड्रग देण्यात आला आणि तो कोणी पुरवला, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिस तपास वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्जचे जाळे पोहोचत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!