Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तमन्नासोबतच्या ब्रेकअपनंतर विजय पूर्णपणे खचला होता; पण नंतर…

तमन्नासोबतच्या ब्रेकअपनंतर विजय पूर्णपणे खचला होता; पण नंतर…

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक मानले जाणारे विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे गेल्या वर्षी ब्रेकअप झाले. ते सुमारे दोन वर्षे नात्यात होते. मात्र, या ब्रेकअपचा विजयवर खूप मोठा परिणाम झाला. विजय ब्रेकअपनंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याऐवजी पुन्हा त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करावे, यासाठी तो सुमारे 14 महिने प्रसिद्धीपासून दूर राहिला होता.

विजय म्हणाला की, लोकांच्या अति हस्तक्षेपामुळे त्याला खूप त्रास झाला. त्याने आपल्या नात्याबद्दल ना डेटिंगबद्दल, ना ब्रेकअपबद्दल – कधीही उघडपणे चर्चा केली नसतानाही, लोकांनी त्याला खूप टार्गेट केले. पूर्वी, जर कोणी सार्वजनिक ठिकाणी कोणाबद्दल वाईट बोलले, तर ते चुकीचे मानले जायचे. पण आता, सर्व काही बदलले आहे. जो छळ करतो त्याला कोणी काही बोलत नाही. उलट, ज्याचा छळ होतो त्याच्या विरोधात इतर लोक बोलायला लागतात.

गेल्या वर्षभरात त्याच्याबद्दल अनेक नकारात्मक गोष्टी आणि खोट्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. जग इतक्या झपाट्याने बदलत आहे की, मला जुळवून घेणे शक्य होत नाहीये. लोकांची बोलण्याची आणि प्रतिक्रिया देण्याची पद्धत खूपच वैयक्तिक आणि थेट झाली आहे. कधीकधी, खोट्या आणि बनावट गोष्टी लिहिल्या जातात ज्या खऱ्या नसतात.

कामातून घेतलेल्या विश्रांतीमुळे कुटुंबाशी जवळ

विजयने कबूल केले की, विश्रांती घेण्याचा एक फायदा म्हणजे तो आपल्या कुटुंबाच्या आणि प्रियजनांच्या अधिक जवळ आला. मला वाटले की मला या सगळ्याचा भाग व्हायचे नाही. म्हणून मी मला जे आवडते ते करायला सुरुवात केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!