मुंबई : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आणि यूट्यूबर कनिका शर्मा आणि साकिब सैफी त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. धर्माबाहेर लग्न केल्याबद्दल कनिकाला सतत ट्रोल केले जात आहे. सुरुवातीचे काही दिवस कनिका ट्रोलिंगमुळे विचलित झाली नाही, पण आता तिचा संयम संपला आहे. तिने आता उघडपणे बोलण्याचे ठरवले आहे.
कनिका शर्मा आणि साकिब सैफी कॉमेडी कंटेंट तयार करण्यासाठी ओळखले जातात. एकत्र काम करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. यावर्षी मार्चमध्ये कनिका आणि साकिबने हिंदू-मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न केले. कनिका हिंदू ब्राह्मण कुटुंबातील आहे, तर साकिब मुस्लिम कुटुंबातील आहे. त्यांच्या लग्नानंतर, धर्माबाहेर लग्न केल्याबद्दल कनिकाला शिवीगाळ केली जात आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने ट्रोलर्सवर जोरदार टीका केली आहे.
कनिकाने म्हटले की, तुम्ही मला शिव्या देत आहात, माझ्या आई-वडिलांना शिव्या देत आहात, माझ्या भावाला शिव्या देत आहात. तुम्ही कोण आहात? मी त्याच्याशी लग्न केलं,’ ‘मी हे केलं, मी ते केलं,’ असं म्हणणारे तुम्ही कोण? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? तुम्ही माझ्या आईला शिव्या देणार का? तुम्ही माझ्या वडिलांना विचारणार का, ‘हा कोणाचा मुलगा आहे?, असे म्हणत कनिका भावूक झाली.


