Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shiv Sena faction : शिंदे गटात हाणामारी! बैठकीतच दोन गट आमनेसामने; कॉलर पकडून धक्काबुक्की

Shiv Sena faction : शिंदे गटात हाणामारी! बैठकीतच दोन गट आमनेसामने; कॉलर पकडून धक्काबुक्की

Shiv Sena faction : बुलढाणा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा वाद उफाळून आला आहे. देऊळगाव राजा येथे झालेल्या बैठकीदरम्यान दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याने पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे.

नवनियुक्त जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत होती. यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र बैठक सुरू असतानाच काही माजी पदाधिकाऱ्यांनी आपल्याला निमंत्रण नसल्याचा आरोप करत सभागृहात प्रवेश केला आणि घोषणाबाजी सुरू केली.

संजय सोनार यांच्या सत्काराला विरोध केल्यामुळे वातावरण अधिक तापले. दोन्ही गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, जो पुढे थेट धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत पोहोचला. काहींनी एकमेकांची कॉलर पकडल्याचेही समोर आले आहे.

यावेळी काही कार्यकर्त्यांनी डॉ. खेडेकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केल्याने वाद आणखी चिघळला. संपूर्ण प्रकार संपर्कप्रमुखांच्या समोरच घडल्याने पक्षातील मतभेद उघडपणे समोर आले आहेत.

या घटनेमुळे जिल्ह्यात शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष तीव्र झाल्याची चर्चा सुरू असून, आगामी राजकारणावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!