Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PM Modi Address to Nation: पंतप्रधान मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार; मोठी घोषणा होण्याची शक्यता

PM Modi Address to Nation: पंतप्रधान मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार; मोठी घोषणा होण्याची शक्यता

PM Modi Address to Nation: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. या संबोधनामुळे राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य जनतेमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी पंतप्रधानांनी जेव्हा जेव्हा रात्रीच्या वेळी देशाला संबोधित केले आहे, तेव्हा नोटाबंदी, कलम ३७० किंवा लॉकडाऊन यांसारखे ऐतिहासिक आणि मोठे निर्णय जाहीर झाले आहेत. आजच्या संबोधनाचा नेमका विषय अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही, मात्र देशहिताच्या दृष्टीने एखादी मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्यानंतर मोदींचा आक्रमक पवित्रा
हे संबोधन अशा वेळी होत आहे, जेव्हा अवघ्या एक दिवसापूर्वी महिला आरक्षणाशी संबंधित महत्त्वाचे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. “हे विधेयक फेटाळले जाणे हा सरकारचा पराभव नसून, देशातील महिलांना त्यांचे हक्क मिळण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी घातलेला हा अडथळा आहे,” असे खडे बोल त्यांनी सुनावले. महिलांना निर्णय-प्रक्रियेत स्थान देण्याची वेळ आली असताना विरोधकांनी घेतलेली ही भूमिका त्यांनाच महाग पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

विरोधकांवर साधला निशाणा; सदसद्विवेकबुद्धीचे केले होते आवाहन
शुक्रवारी मतदानापूर्वी पंतप्रधानांनी सर्व खासदारांना आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा आवाज ऐकून महिलांच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले होते. देशाच्या निम्म्या लोकसंख्येला त्यांचे न्याय्य स्थान मिळवून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, विधेयक नामंजूर झाल्याने आता पंतप्रधान थेट जनतेशी संवाद साधून आपली पुढील दिशा स्पष्ट करतील, अशी अपेक्षा आहे. आजच्या ८:३० च्या संबोधनाकडे केवळ भारताचेच नव्हे, तर जगाचे लक्ष लागले असून, प्रशासन यावर काय नवीन पाऊल उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!