Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘त्या’ स्टंटदरम्यानच माझा जीव गेला असता; खिलाडी अक्षय कुमारने सांगितला शुटिंगचा किस्सा

‘त्या’ स्टंटदरम्यानच माझा जीव गेला असता; खिलाडी अक्षय कुमारने सांगितला शुटिंगचा किस्सा

मुंबई : बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा धोकादायक स्टंट आणि ॲक्शनची चर्चा होते, तेव्हा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे नाव सर्वात आधी येते. मार्शल आर्ट्समध्ये पारंगत असलेल्या अक्षयने आपल्या कारकिर्दीत अनेक धोकादायक स्टंट केले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का हे स्टंट करताना अक्षय कुमारच्या हे जीवावर बेतलं असतं.

अक्षय कुमारने ‘सैनिक’ चित्रपटातील एका प्रसंगाची आठवण सांगितली, जिथे त्याला एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारायची होती. त्या दृश्यादरम्यान एका क्षणासाठी त्याला वाटले की तो खाली पडेल. तेव्हा व्हीएफएक्स वगैरे काहीच नव्हते…सर्व काही मला स्वतःच करावे लागत होते. ‘इंटरनॅशनल खिलाडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक मोठा अपघातही थोडक्यात टळला. अक्षयने खुलासा केला की, ”एका स्टंटदरम्यान त्याच्या शरीराचा अर्धा भाग जवळजवळ तुटला होता. तो कसा वाचला हे मला अजूनही कळत नाही…हा निव्वळ एक चमत्कार होता.”

‘खिलाडी ७८६’ चित्रपटातील आणखी एका धोकादायक स्टंटची आठवण सांगताना अक्षयने स्पष्ट केले की, त्याला हॉट एअर बलूनमधून उडी मारायची होती. हा स्टंट अत्यंत धोकादायक होता, पण तो कसातरी बचावला. अक्षय कुमार त्याच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!