मुंबई : ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना त्यांच्या स्पष्टवक्त्या मतांसाठी ओळखले जातात. त्यांची ‘शक्तिमान’ची भूमिका चांगलीच प्रसिद्ध झाली होती. आता याच ‘शक्तिमान’ची भूमिका रणवीर सिंग स्वीकारणार होता. मात्र, त्याला मुकेश खन्ना यांनी विरोध केला होता, अशी माहिती समोर आली आहे. असे जरी असले तरी मुकेश खन्ना यांनी ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटातील अभिनेत्याचे कौतुकही केले.
मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंगच्या अष्टपैलूपणाचे कौतुक केले, पण आपली भूमिकाही कायम ठेवली. ते म्हणाला, “माझा याला विरोध आहे कारण तो एक उत्कृष्ट अभिनेता असला तरी, त्याच्यात प्रचंड ऊर्जा आहे. तो ‘धुरंधर’, ‘गली बॉय’, ‘खिलजी’ करू शकतो. पण ‘शक्तिमान’मध्ये केवळ अभिनेताच नाही, तर चेहराही महत्त्वाचा आहे. पृथ्वीराज चौहान उभे राहिल्यावर पृथ्वीराज चौहानसारखेच दिसले पाहिजेत, जे अक्षय कुमार चित्रपटात दिसला नाही. त्याने विग वगैरे घातला होता. जेव्हा मी ऐतिहासिक पात्र साकारायचो, तेव्हा मला फक्त कपडे बदलायला दीड तास लागायचा. मी सात इंची मुकुट घालायचो.
मुकेश खन्ना यांनी हे देखील उघड केले की त्यांच्या विरोधामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सोनी पिक्चर्स हा प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी खूप उत्सुक आहे. हे माझं नुकसान आहे. सोनी मला कोट्यवधी रुपये द्यायला तयार असल्यामुळे माझं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे. मला हा अभिनेता नको आहे, असे म्हटले. मला ‘शक्तिमान’ची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता शोधण्याकरिता मी देशभरात ऑडिशन्स घेईन.


