Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Google आणि GUCCI येणार एकत्र; स्मार्ट ग्लासेस बनवणार, Apple मधील तणाव वाढणार

Google आणि GUCCI येणार एकत्र; स्मार्ट ग्लासेस बनवणार, Apple मधील तणाव वाढणार

नवी दिल्ली : सध्या अनेक टेक्नॉलॉजी समोर येत आहे. त्यात स्मार्ट ग्लासेसमधील स्पर्धा तीव्र होत आहे. मेटा या क्षेत्रात सर्वात मोठी कंपनी राहिली आहे. मात्र, यावर्षी कंपनीला तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. Apple यावर्षी आपले पहिले एआय स्मार्ट ग्लासेस लाँच करण्याची शक्यता आहे.

गुगलने लक्झरी फॅशन हाऊस GUCCI सोबत भागीदारी केली आहे. या करारानुसार, दोन्ही कंपन्या संयुक्तपणे प्रीमियम अँड्रॉइड एक्सआर-आधारित स्मार्ट ग्लासेस विकसित करतील. Google ला आपले स्मार्ट ग्लासेस केवळ टेक गॅझेट्स न वाटता, रोजच्या वापरातील फॅशन उपकरणांसारखे वाटावेत असे डिझाइन करायचे आहे. त्यामुळे, या ग्लासेसमध्ये स्टायलिश फ्रेम्स आणि उत्कृष्ट फिनिशिंग असेल असा विश्वास आहे. काही वर्षांपूर्वी ॲपलने सुरू केलेला एक ट्रेंड जोर धरत आहे. या टेक जायंटने आपल्या प्रीमियम ॲपल वॉचच्या विशेष व्हर्जनसाठी हर्मेससोबत भागीदारी केली.

आता, इतर कंपन्याही त्यांची कॉपी करत आहेत आणि आपल्या गॅजेट्सना लाइफस्टाइल ॲक्सेसरीजमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत. या शर्यतीत पुढे राहण्यासाठी ॲपल प्राडासोबत हातमिळवणी करू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!