Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

iPhone 18 Pro मिळणार तीन कलर व्हेरियंटमध्ये; युजर्सला लागली प्रतिक्षा…

iPhone 18 Pro मिळणार तीन कलर व्हेरियंटमध्ये; युजर्सला लागली प्रतिक्षा…

नवी दिल्ली : आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्सचे लाँच डेट जवळ येत असताना आता नवीन माहिती देखील समोर येत आहे. दोन्ही मॉडेल्ससाठीचे कलर ऑप्शन्स उघड झाले आहेत. अलीकडील लीक्सनुसार, आयफोन वापरकर्त्यांना यावेळी एक नवीन कलर ऑप्शन मिळणार आहे आणि आयफोन 17 प्रोच्या कॉस्मिक ऑरेंज कलरप्रमाणेच तोही हिट ठरणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, ऍपल सध्या आयफोन 18 प्रो मॉडेल्ससाठी चार कलर ऑप्शन्स देत आहे. यामध्ये लाईट ब्लू, डार्क चेरी, डार्क ग्रे आणि सिल्व्हर यांचा समावेश आहे. प्रो मॉडेल्स डीप रेडमध्ये उपलब्ध असतील, परंतु ताज्या रिपोर्टमध्ये तो डार्क चेरी असल्याचे नमूद केले आहे. तो कॉस्मिक ऑरेंजइतका चमकदार नसेल, पण तो वेगळा दिसेल. लाईट ब्लू कलर आयफोन 17 च्या मिस्ट ब्लू रंगासारखा असेल. या चार रंगांच्या पर्यायांपैकी फक्त तीनच लॉन्च केले जातील. ॲपल सिल्व्हर रंगाचा पर्याय आणणार नसल्याची माहिती आहे.

यापूर्वीही चमकदार रंगांच्या पर्यायांसह फोन लॉन्च केले गेले आहेत, परंतु आयफोन 17 प्रो सह, ॲपलने फ्लॅगशिप डिव्हाइसेससाठीही चमकदार रंगांना लोकप्रिय केले. यापूर्वी, असे रंग फक्त बेस आयफोन किंवा स्वस्त फोनमध्ये उपलब्ध होते. आयफोन 17 प्रो नंतर, ओप्पोसह अनेक कंपन्यांनी त्यांचे फ्लॅगशिप डिव्हाइसेस नारंगी रंगात लॉन्च केले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!