Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अमरावतीतील अयान प्रकरणात नवा ट्विस्ट; ऐषारामी जीवनशैलीचा VIDEO व्हायरल, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

अमरावतीतील अयान प्रकरणात नवा ट्विस्ट; ऐषारामी जीवनशैलीचा VIDEO व्हायरल, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Ayan Ahmed Case : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील बहुचर्चित लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी अयान अहमदचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून त्यामुळे तपासाला नवे वळण मिळाले आहे. या व्हिडिओमध्ये अयानची आलिशान जीवनशैली स्पष्ट दिसत असून तो महागड्या कारमध्ये फिरताना, अनेक महागडे मोबाईल वापरताना आणि पैशांच्या बंडलसह दिसत आहे. त्यामुळे त्याच्याकडे एवढी संपत्ती कशी आली, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

व्हिडिओत अयान महागड्या वाहनातून प्रवास करताना आणि शस्त्रासह दिसत असल्याने संबंधित वाहनांची मालकी, तसेच शस्त्र वापरासाठी आवश्यक परवान्याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात तपास यंत्रणा अधिक माहिती गोळा करत आहे.

दरम्यान, या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असून आरोपीकडून कोणताही पश्चाताप व्यक्त झालेला नाही, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. उलट चौकशीत तो सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याचे सांगितले जात आहे.

तपासादरम्यान अयानने मुलींशी संपर्क साधण्याची आणि त्यांना जाळ्यात ओढण्याची पद्धत कबूल केल्याची माहिती आहे. स्वतःच्या बचावासाठी त्याने संबंधित घटना परस्पर संमतीने झाल्याचा दावा केला असला, तरी एका अल्पवयीन पीडितेच्या समोर येण्यामुळे हा दावा फोल ठरत आहे.

या प्रकरणात अधिकाधिक पीडित मुली पुढे येऊन तक्रारी नोंदवत असल्याने तपासाची व्याप्ती वाढत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आणखी महत्त्वाचे तपशील पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!