अतिविचार करणे आरोग्यासाठी कायम धोकादायक ठरू शकते. ओव्हरथिंकिंग म्हणजे एखाद्या घटनेबद्दल, बोलण्याबद्दल किंवा वागण्याबद्दल पुन्हा-पुन्हा विचार करणे, त्यात नसलेले अर्थ शोधणे आणि मनात उगाच शंका निर्माण करणे. खासकरून प्रेमसंबंध असो वा कर्ज किंवा इतर काही गोष्टींमध्ये हे जास्त दिसतं. या सवयींमुळे विनाकारण तणाव वाढतो. त्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
सवय चिंता, कमी आत्मविश्वास आणि असुरक्षिततेच्या भावनेमुळे येते. या भावनांमुळे आपण खरी परिस्थिती समजून घेण्याऐवजी आपल्याच कल्पनांना खरं मानू लागतो. प्रेमसंबंधातही हे असंच घडतं. याचा परिणाम म्हणजे पार्टनरवर संशय वाढतो, संवादात अंतर येते. नात्यात विश्वास आणि स्पष्ट संवाद खूप महत्त्वाचा कोणत्याही नात्यात विश्वास आणि स्पष्ट संवाद खूप महत्त्वाचा असतो. पण ओव्हरथिंकिंग या दोन्ही गोष्टींना धक्का लावते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटू लागतं की पार्टनरचं प्रेम कमी झाले, तेव्हा त्याच्या वागण्यात बदल होतो. ते जास्त प्रश्न विचारू लागतात, पार्टनरला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात किंवा भावनिकदृष्ट्या दूर जातात.
ओव्हरथिंकिंगमुळे व्यक्ती आपल्या भावना योग्यप्रकारे व्यक्त करू शकत नाही. मनात अनेक शंका आणि प्रश्न असल्यामुळे, त्यांना जे सांगायचं आहे ते स्पष्टपणे सांगता येत नाही. यामुळे गैरसमज आणखी वाढतात. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी अतिविचार टाळाच. त्याने आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतात.


