Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राजकीय भूकंप! एकनाथ शिंदेंचा भाजपला जोरदार धक्का, साताऱ्यातील बड्या नेता शिवसेनेत

राजकीय भूकंप! एकनाथ शिंदेंचा भाजपला जोरदार धक्का, साताऱ्यातील बड्या नेता शिवसेनेत

Maharashtra Politics : सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे निकटवर्तीय आणि माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिंदे यांच्या सातारा दौऱ्यादरम्यान हा पक्षप्रवेश पार पडला.

या घडामोडीमुळे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असलेले राजाभाऊ बर्गे यांनी भाजपची साथ सोडत शिवसेनेचा झेंडा हातात घेतला. या प्रवेशावेळी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील आगामी २०२९ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असून साताऱ्यातही पक्षात जोरदार ‘इनकमिंग’ सुरू आहे. बर्गे यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद अधिक वाढल्याचे मानले जात आहे.

विशेष म्हणजे, आमदार महेश शिंदे हे शिवसेनेत असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपकडे झुकाव असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. त्यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे यांनीही भाजपच्या तिकिटावर जिल्हा परिषद निवडणूक जिंकली होती. अशा परिस्थितीत राजाभाऊ बर्गे यांच्या पक्षांतरामुळे कोरेगावच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!