Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

KEM Hospital Rename: केईएम रुग्णालयाचं नाव बदलणार? मंगलप्रभात लोढांनी सुचवलं ‘हे’ भारतीय नाव

KEM Hospital Rename: केईएम रुग्णालयाचं नाव बदलणार? मंगलप्रभात लोढांनी सुचवलं ‘हे’ भारतीय नाव

KEM Hospital Rename: मुंबईची आरोग्यवाहिनी आणि ऐतिहासिक वारसा असलेले किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय आता एका नव्या नावाने ओळखले जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे नाव बदलून ते अधिक भारतीय संस्कृतीशी सुसंगत असावे, अशी आग्रही मागणी मुंबई महानगरपालिकेकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी पालिका प्रशासनाला अधिकृत पत्र लिहून प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रस्तावित नवीन नाव?
मंत्री लोढा यांनी पत्रात सुचवलेल्या प्रस्तावानुसार, रुग्णालयाचे नाव “कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय” असे करण्यात यावे. विशेष म्हणजे, या नावामुळे रुग्णालयाचे लोकप्रिय संक्षिप्त रूप ‘केईएम’ (KEM – Kaushalya Shrestha Eklavya Memorial) हे पूर्वीसारखेच कायम राहील, असा तर्कही त्यांनी मांडला आहे. ब्रिटिशकालीन गुलामगिरीची ओळख पुसून भारतीय अस्मितेचे नाव देणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दुसऱ्यांदा रेटली मागणी
यापूर्वी जानेवारी २०२६ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान लोढा यांनी ही संकल्पना मांडली होती. आता दुसऱ्यांदा आणि अधिकृत पत्राद्वारे पाठपुरावा केल्याने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. १९२६ मध्ये ब्रिटनचे राजे किंग एडवर्ड (सातवे) यांच्या स्मरणार्थ या रुग्णालयाची स्थापना झाली होती. आता १०० वर्षांनंतर या ऐतिहासिक नावाचा कायापालट करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटणार?
केईएम रुग्णालय हे केवळ उपचार केंद्र नसून ती मुंबईची एक जागतिक ओळख आहे. वारसा प्रेमी आणि काही राजकीय पक्षांनी या ऐतिहासिक नावाशी छेडछाड करण्यास विरोध दर्शविला आहे. तज्ज्ञांच्या मते, नावापेक्षा रुग्णालयातील सुविधा आणि डॉक्टरांच्या कामावर लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या या रुग्णालयाच्या नामांतरावर आता प्रशासन आणि सत्ताधारी काय भूमिका घेतात, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!