Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Yugendra Pawar: ‘आता पवार विरुद्ध पवार सामना नको…’; रोहित पवारांच्या ‘त्या’ विधानावर युगेंद्र पवारांची स्पष्ट भूमिका

Yugendra Pawar: ‘आता पवार विरुद्ध पवार सामना नको…’; रोहित पवारांच्या ‘त्या’ विधानावर युगेंद्र पवारांची स्पष्ट भूमिका

Yugendra Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेले पाहायला मिळत असतानाच, २०२९ च्या संभाव्य संघर्षावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. २०२९ मध्ये ‘जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार’ अशी लढत होऊ शकते, या रोहित पवारांच्या दाव्यावर आता युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका मांडली असून, पुन्हा कौटुंबिक संघर्ष नको असल्याची भावना व्यक्त केली आहे.

रोहित पवारांचे विधान वैयक्तिक: युगेंद्र पवार
आमदार रोहित पवार यांनी २०२९ च्या निवडणुकीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याचे संकेत दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना युगेंद्र पवार म्हणाले की, “रोहित पवार यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक असू शकते. यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही एकमेकांविरुद्ध लढलो, त्याचे आम्हाला आजही दुःख आहे. आता पुन्हा एकदा कुटुंबात असा संघर्ष व्हावा, अशी आमची अजिबात इच्छा नाही.”

कुटुंब एकत्र, पण राजकीय दिशा काय?
या पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी स्वतः सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा आणि विधानसभेला एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले पवार कुटुंब या दुःखद प्रसंगी एकत्र आले आहे. रोहित पवारांच्या मते, पक्ष वेगळे असल्यामुळे भविष्यात राजकीय संघर्ष अटळ आहे. जय पवार जर २०२९ मध्ये उमेदवार असतील, तर त्यांच्या विरोधात युगेंद्र पवार मैदानात असू शकतात, असे भाकीत त्यांनी वर्तवले होते.

जय पवारांची ‘कार्यकर्ता’ राहण्याची इच्छा
दुसरीकडे, जय पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, जरी कार्यकर्त्यांची मागणी असली तरी त्यांना सध्या केवळ ‘कार्यकर्ता’ म्हणून काम करायला आवडेल. मात्र, राजकारणात पक्षाचा आदेश अंतिम असतो, असे सांगत रोहित पवारांनी भविष्यातील संघर्षाची दारे उघडीच ठेवली आहेत. युगेंद्र पवारांच्या या भूमिकेनंतर बारामतीतील भविष्यातील राजकारण नेमके कोणते वळण घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!