Sunetra Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर आता बारामती मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणूकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल ४ मे रोजी लागणार आहे.
दरम्यान, निकालापूर्वीच सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात लक्षवेधी बॅनर्स झळकले असून त्यावर त्यांचा उल्लेख “राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री” असा करण्यात आला आहे. या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
बारामती विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून मैदानात आहेत. या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र निकालाआधीच त्यांच्या समर्थकांनी विजयाचा दावा करत जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे.
बॅनर्स लावत समर्थकांनी पुणे शहरात वातावरण तापवलं असून, सुनेत्रा पवार या बारामतीतून मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, निकालापूर्वीच अशा प्रकारच्या घोषणांमुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या असून, प्रत्यक्ष निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


