पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, वसई जनता सहकारी बँक लिमिटेड, वसई येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगारही मिळू शकतो.
वसई जनता सहकारी बँक लिमिटेड, वसई येथे व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक (गुंतवणूक विभाग) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्रात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक (गुंतवणूक विभाग).
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई- मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 22 एप्रिल 2026.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 दिवसांच्या आत (28 एप्रिल 2026).
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : personnel.ho@vjsbl.com
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://vjsbl.com/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे


