Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबईतील मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण अपघात; बाईकच्या धडकेत वृद्धासह तिघांचा मृत्यू

मुंबईतील मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण अपघात; बाईकच्या धडकेत वृद्धासह तिघांचा मृत्यू

Mumbai Accident : मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात सोमवारी पहाटे भीषण अपघात घडून तिघांचा मृत्यू झाला. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला भरधाव दोन बाईकने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात वृद्ध व्यक्तीसह एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला आहे.

सकाळी सुमारे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गिरगाव परिसरातील वृद्ध व्यक्ती चालत असताना वेगाने येणाऱ्या दोन मोटारसायकलींनी त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर बाईकवरील दोघेही रस्त्यावर कोसळले. अपघात इतका भीषण होता की तिन्ही जण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तत्काळ जीटी रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. दोन्ही बाईक अतिवेगात असल्याची प्राथमिक माहिती असून रेसिंग सुरू होते का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही बाईकची चाकं, सायलेन्सर आणि चेसिसचा भाग निखळून पडला होता. या दोन्ही बाईक खूप वेगात होत्या. दोन्ही बाईक एकमेकांपासून जवळच्या अंतरावर होत्या. या दोन्ही बाईकने वृद्ध व्यक्तीला धडक दिली. या बाईकस्वारांमध्ये रेस सुरु होती का, याचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!