Today शुक्रवार, 12th जून 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mohan Bhagwat : मोठी बातमी..! मोहन भागवत प्रवास करत असलेल्या शताब्दी एक्स्प्रेसवर दगडफेक; डब्याच्या काचा फुटल्या, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

Mohan Bhagwat : मोठी बातमी..! मोहन भागवत प्रवास करत असलेल्या शताब्दी एक्स्प्रेसवर दगडफेक; डब्याच्या काचा फुटल्या, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या लखनऊ-नवी दिल्ली स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत मोहन भागवत तसेच अन्य कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही.

माहितीनुसार, स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेस कानपूरहून दिल्लीकडे जात असताना फिरोजाबाद रेल्वे विभागातील मक्खनपूर स्थानक पार केल्यानंतर रसूलपूर परिसरातील पेमेश्वर गेटजवळ अचानक दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एक मोठा दगड एक्झिक्युटिव्ह क्लासच्या ई-1 डब्याच्या खिडकीवर आदळल्याने बाहेरील काच फुटली.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मोहन भागवत हे याच डब्यातील सीट क्रमांक 39 आणि 40 वर प्रवास करत होते. मात्र ते खिडकीपासून दूर बसले असल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या.

दगडफेकीनंतर ट्रेनला खबरदारीचा उपाय म्हणून टुंडला जंक्शनच्या आऊटर परिसरात थांबवण्यात आले. रेल्वे पोलीस आणि रेल्वे संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून डब्याची तपासणी केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करून सुमारे 20 मिनिटांनंतर रेल्वेला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार अचानक घडला की नियोजनबद्ध होता, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तपासले जात आहेत. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सुरक्षा यंत्रणांनी तपासाची गती वाढवली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!