Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Password आणि Passkey मध्ये फरक काय? यापैकी सर्वाधिक सुरक्षित कोणते…

Password आणि Passkey मध्ये फरक काय? यापैकी सर्वाधिक सुरक्षित कोणते…

नवी दिल्ली : सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत, सर्वत्र लॉगिनसाठी पासवर्ड आवश्यक आहेत. परंतु, वारंवार पासवर्ड लक्षात ठेवणे, ते सुरक्षित ठेवणे आणि हॅकिंगपासून त्यांचे संरक्षण करणे हे सोपे काम नाही. या समस्येवर उपाय म्हणून Passkey नावाची एक नवीन सिस्टिम समोर आली आहे.

आपल्यापैकी अनेकांनी Password आणि Passkey हे दोन्ही शब्द ऐकले असतील. त्यात Passkey ही एक लॉगिन पद्धत आहे ज्यामध्ये पासवर्ड टाईप करण्याची आवश्यकता नसते. हे तंत्रज्ञान तुमच्या डिव्हाइसवर संग्रहित केलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे, जसे की फिंगरप्रिंट, फेस अनलॉक किंवा पिन, तुमची ओळख व्हॅलिडेट करते. याचा अर्थ पासवर्ड लक्षात ठेवण्याचा त्रास आता संपणार आहे. पासकी पब्लिक-की क्रिप्टोग्राफीवर आधारित आहेत. दोन प्रकारच्या की तयार केल्या जातात: एक पब्लिक की आणि एक प्रायव्हेट की. पब्लिक की सर्व्हरवर संग्रहित केली जाते, तर प्रायव्हेट की तुमच्या डिव्हाइसवर सुरक्षित राहते आणि कधीही बाहेर जात नाही.

पासवर्ड अनेकदा वीक, पुनरावृत्त किंवा लीक झालेले असतात. ज्यामुळे हॅकिंगचा धोका वाढतो. याउलट, पासकीमध्ये कोणताही पासवर्ड नसतो आणि ती चोरली जाऊ शकते. ही प्रणाली फिशिंग हल्ल्यांपासूनही अत्यंत सुरक्षित मानली जाते, कारण युजर आपला पासवर्ड कोणत्याही बनावट वेबसाइटवर टाकत नाही. शिवाय, प्रत्येक लॉगिनसाठी एकव क्रिप्टोग्राफिक स्वाक्षरी तयार केली जाते, ज्यामुळे सुरक्षा आणखी मजबूत होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!