Today शुक्रवार, 1st मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Iran-US Ceasefire: मोठी बातमी! इराण-अमेरिकेमध्ये युद्धविराम! 60 दिवसांचा संघर्ष संपला

Iran-US Ceasefire: मोठी बातमी! इराण-अमेरिकेमध्ये युद्धविराम! 60 दिवसांचा संघर्ष संपला

Iran-US Ceasefire: जागतिक राजकारणाला मोठा दिलासा देणारी एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. 28 फेब्रुवारीपासून इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला तीव्र सशस्त्र संघर्ष आता अधिकृतपणे थांबला आहे. ट्रम्प प्रशासनाने ‘वॉर पॉवर्स रिझोल्यूशन’ (War Powers Resolution) अंतर्गत आपली लष्करी कारवाई संपुष्टात आणल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या (संसदेच्या) 60 दिवसांच्या अनिवार्य मंजुरीची मुदत संपण्यापूर्वीच अमेरिकेने हे पाऊल उचलल्यामुळे युद्धाचे ढग तूर्तास विरले आहेत.

लष्करी पेच आणि ‘स्वसंरक्षणा’ची कठोर अट
युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी, अमेरिकेने सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाची अट कायम ठेवली आहे. राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले आहे की, जर इराणने अमेरिकेच्या नौदल जहाजांवर किंवा त्यांच्या मालमत्तेवर पुन्हा कोणताही हल्ला केला, तर सर्वोच्च सेनापती या नात्याने राष्ट्राध्यक्ष काँग्रेसच्या पूर्वपरवानगीशिवाय त्वरित प्रतिहल्ला करण्याचे अधिकार राखून आहेत. अधिकृत आदेशात नौदल नाकेबंदीचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही, मात्र समुद्रातील शांतता ही पूर्णपणे इराणच्या पुढील भूमिकेवर अवलंबून असेल.

 इराणचा संघ अमेरिकेत मैदानात उतरणार
या युद्धविरामाचा सर्वात मोठा आणि सकारात्मक परिणाम क्रीडा क्षेत्रावर झाला आहे. फिफाचे (FIFA) अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी आगामी विश्वचषकात इराणच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही इराणी खेळाडूंच्या स्वागताचे आश्वासन दिले आहे. इराणचा समावेश ‘गट G’ (Group G) मध्ये करण्यात आला असून, त्यांचे सामने लॉस एंजेलिस (न्यूझीलंड आणि बेल्जियमविरुद्ध) आणि सिएटल (इजिप्तविरुद्ध) येथे खेळवले जातील. ही जागतिक स्पर्धा 11 जूनपासून अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे सुरू होत आहे.

इस्रायलला शस्त्रास्त्रांचा विक्रमी पुरवठा सुरूच
एककीडे इराणसोबत शांततेची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे अमेरिकेने इस्रायलला होणारी लष्करी मदत मात्र अधिक वेगवान केली आहे. गेल्या 24 तासांत 6,500 टन युद्धसाहित्य घेऊन दोन महाकाय मालवाहू जहाजे इस्रायलच्या अशदोद आणि हैफा बंदरात दाखल झाली आहेत. 28 फेब्रुवारीपासून आतापर्यंत अमेरिकेने एकूण 1,15,600 टन शस्त्रास्त्रे इस्रायलला पाठवली आहेत. दररोज सरासरी 2,000 टन युद्धसाहित्याचा हा पुरवठा पाहता, इस्रायल एखाद्या मोठ्या लष्करी मोहिमेसाठी सज्ज होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!