Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महाराष्ट्र हादरला..! चिमुरडीवर अत्याचार करुन हत्या; नराधमाने विकृतीचं टोक गाठलं, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र हादरला..! चिमुरडीवर अत्याचार करुन हत्या; नराधमाने विकृतीचं टोक गाठलं, नेमकं काय घडलं?

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली असून, नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीची हत्या झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुरडी सुट्टीसाठी नसरापूर येथे आजीकडे आली होती. दुपारच्या सुमारास ती राम मंदिर परिसरात खेळत असताना बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी तिचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ती एका व्यक्तीसोबत जाताना दिसल्याचे समोर आले.

त्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली असता जवळील एका गोठ्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीचा शोध घेतला. संशयित व्यक्ती गावाजवळील नदीकाठच्या परिसरात आढळून आला, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल घटनास्थळी दाखल झाले. संतप्त ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याबाहेर रास्ता रोको आंदोलन करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने ग्रामस्थांशी चर्चा केली.

दरम्यान, या प्रकरणात १५ दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येईल आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल, अशी ग्वाही पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!