Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

IMD Weather Update: मे महिन्यात उन्हाच्या झळा की पावसाचा दिलासा? IMD कडून मान्सूनच्या आगमनाबाबत मोठी अपडेट

IMD Weather Update: मे महिन्यात उन्हाच्या झळा की पावसाचा दिलासा? IMD कडून मान्सूनच्या आगमनाबाबत मोठी अपडेट

IMD Weather Update: एप्रिलमधील विक्रमी उष्णतेनंतर मे महिना दिलासादायक ठरेल की उन्हाचा चटका आणखी वाढेल, यावर भारतीय हवामान विभागाने (IMD) प्रकाश टाकला आहे. यंदा मे महिन्यात देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून मान्सूनच्या प्रवासाबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

तापमानात चढ-उतार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मे महिन्यात देशातील बहुतांश भागांत दिवसाचे तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, रात्रीच्या किमान तापमानात वाढ होणार असल्याने रात्रीची झोप उकाड्यामुळे विस्कळीत होऊ शकते. विशेषतः दक्षिण आणि वायव्य भारतातील राज्यांमध्ये दिवसाचा पाराही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची भीती आहे.

पावसाची जोरदार हजेरी
मे महिन्यात संपूर्ण देशात सरासरीच्या 110% पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात मे महिन्याची पावसाची सरासरी साधारणपणे 61.4 मिमी असते, जी यंदा ओलांडली जाण्याची चिन्हे आहेत. एकूणच या पावसामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळू शकेल. तथापि, ईशान्य आणि पूर्व भारतात पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असल्याने तेथे कोरडे हवामान असेल.

मान्सूनचे आगमन: महत्त्वाची तारीख
मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मान्सून 14 ते 16 मे दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची दाट शक्यता आहे. साधारण 20 मे पर्यंत मान्सूनच्या प्रवासाला अधिक वेग येण्याचे संकेत आहेत. पॅसिफिक महासागरात ‘एल निनो’ची स्थिती विकसित होत असल्याने पावसाच्या वितरणावर त्याचा काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

उष्णतेची लाट आणि विजेचा प्रश्न
पावसाची शक्यता असली तरी महाराष्ट्र, गुजरात आणि पूर्व किनारपट्टीवरील राज्यांत मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचे (Heat Wave) दिवस वाढण्याची शक्यता आहे. एप्रिलमधील उष्णतेमुळे देशात विजेच्या मागणीत 4% वाढ झाली असून, मे मध्येही हे प्रमाण उच्चांकी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!