Today मंगळवार, 26th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Air India Plane Crash: पायलट निर्दोष, मग ‘ते’ दोन इंजिन बंद का पडले? विमान अपघाताचं गूढ उकललं

Air India Plane Crash: पायलट निर्दोष, मग ‘ते’ दोन इंजिन बंद का पडले? विमान अपघाताचं गूढ उकललं

Air India Plane Crash: गेल्या वर्षी 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने देशाला हादरवून सोडले होते. लंडनला जाणाऱ्या या विमानाला नेमका अपघात कसा झाला, याचे गूढ आता उकलण्याची शक्यता आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स’ने (FIP) सरकारला लिहिलेल्या एका विशेष पत्राने या प्रकरणाला पूर्णपणे नवीन वळण दिले आहे.

बॅटरी ठरली ‘सायलंट किलर’?
पायलट्स संघटनेने सरकारला सादर केलेल्या 21 पानांच्या सविस्तर अहवालात असा दावा केला आहे की, हा अपघात मानवी चुकीमुळे (Human Error) झालेला नाही. विमानातील लिथियम बॅटरीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे हा भीषण अनर्थ ओढवला. या तांत्रिक बिघाडाचे पुरावेही संघटनेने पत्राद्वारे दिले आहेत.

पायलटने बटण न दाबताच इंजिन ‘डेड’
पत्रातील सर्वात खळबळजनक खुलासा म्हणजे, शॉर्ट सर्किटमुळे विमानाची संपूर्ण सिस्टीम कोलमडली होती. शॉर्ट सर्किटमुळे विमानातील दोन्ही इंजिनचे ‘फ्यूल स्विच’ (इंधन पुरवठा करणारी बटणे) आपोआप बंद झाली. धक्कादायक म्हणजे, वैमानिकांनी इंधन बंद करण्यासाठी कोणतीही हालचाल केली नव्हती, तरीही यंत्रणेने इंधन पुरवठा तोडला. परिणामी, उड्डाण घेतल्यावर काही मिनिटांतच विमान कोसळले.

सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह
लिथियम बॅटरीमुळे इंजिनवरचे नियंत्रण सुटणे, ही विमान वाहतूक क्षेत्रातील अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. ‘FIP’ च्या या दाव्यामुळे आता विमानांच्या तांत्रिक सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पत्रानंतर नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) आता नेमकी काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!