Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Tamil Nadu CM Oath Ceremony: तामिळनाडूत ‘विजय’पर्व सुरू! थलपती उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Tamil Nadu CM Oath Ceremony: तामिळनाडूत ‘विजय’पर्व सुरू! थलपती उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Tamil Nadu CM Oath Ceremony: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे सर्वेसर्वा विजय यांनी आज तामिळनाडूच्या राजकारणात नवी क्रांती घडवली आहे. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन विजय यांनी सत्तास्थापनेचा अधिकृत दावा केला असून, आवश्यक बहुमताचे पत्र राज्यपालांना सोपवले आहे. या ऐतिहासिक पावलामुळे तामिळनाडूच्या सत्तासंघर्षाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

नेहरू स्टेडियमवर रंगणार शपथविधीचा सोहळा
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच 7 मे 2026 रोजी विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. हा दिमाखदार सोहळा चेन्नईतील प्रसिद्ध नेहरू स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. सुमारे 5,000 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये जनतेच्या साक्षीने हा शपथविधी पार पडणार आहे. प्रशासकीय यंत्रणेने उद्या सकाळी 6:00 वाजेपर्यंत स्टेडियमची सर्व तयारी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

शपथविधीसाठी ‘मुहूर्त’ निश्चित
राजभवनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधीसाठी उद्या सकाळची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

शुभ मुहूर्त: सकाळी 10:00 ते 11:15 दरम्यान.

वेळ: विजय सकाळी 10:00 वाजण्यापूर्वीच कार्यक्रमस्थळी पोहोचतील आणि 11:30 पर्यंत मुख्य सोहळा संपन्न होईल.

राजकीय समीकरणे बदलली
एका लोकप्रिय अभिनेत्याने राजकारणात प्रवेश करून थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत मारलेली ही मजल तामिळनाडूच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जात आहे. विजय यांच्या पक्षामुळे (TVK) राज्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण आहे. उद्या सकाळी 10:00 वाजता अवघ्या देशाचे लक्ष चेन्नईकडे लागलेले असेल, जेव्हा ‘थलापती’ विजय राज्याची अधिकृत धुरा आपल्या हाती घेतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!