Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: मंत्री अतुल सावेंच्या OSD चा सत्तेचा माज उतरणार! पत्नी-मुलाला बेदम मारहाण केल्याने सावेंकडून चौकशीचे आदेश

Pune Crime: मंत्री अतुल सावेंच्या OSD चा सत्तेचा माज उतरणार! पत्नी-मुलाला बेदम मारहाण केल्याने सावेंकडून चौकशीचे आदेश

Pune Crime: सत्तेचा अहंकार आणि घरगुती हिंसाचाराचा एक विदारक चेहरा पुण्यात समोर आला आहे. राज्याचे मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) विजय धुलचंद कारंडे यांनी आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ माजली आहे. “मी मंत्र्याचा ओएसडी आहे, माझे कुणी काहीही बिघडवू शकत नाही,” अशा शब्दांत दहशत निर्माण करणाऱ्या कारंडे यांनी पत्नीसह चिमुरड्या मुलावरही बॅटने प्रहार केले. या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी कारंडे यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

नेमका वाद कशामुळे झाला?
ही घटना ३० एप्रिल रोजी पुण्यातील क्वीन्स गार्डन या शासकीय निवासस्थानी घडली. संशयास्पद चॅट्स आणि मोबाईल पासवर्डवरून पती-पत्नीत वादाची ठिणगी पडली होती. पत्नीने मोबाईल पासवर्ड मागितल्याच्या रागातून कारंडे यांनी तिला क्रिकेटच्या बॅटने अमानुषपणे मारहाण केली. आईला वाचवण्यासाठी धावलेल्या अवघ्या काही वर्षांच्या मुलालाही कारंडे यांनी सोडले नाही, त्यालाही बॅटने मारहाण करण्यात आली. तक्रारीनुसार, मारहाण करून समाधान न झाल्याने कारंडे यांनी पत्नीचा गळा आवळून तिला संपवण्याचा प्रयत्न केला. कारंडे यांनी सासरच्या मंडळींनाही धमकावून २५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेच्या वडिलांनी केला आहे.

मंत्र्यांची कठोर भूमिका; कारंडेंची गच्छंती अटळ?
या गंभीर प्रकारानंतर मंत्री अतुल सावे यांनी तातडीने भूमिका स्पष्ट करत कारंडे यांच्या कृत्याचा निषेध केला आहे. सावे म्हणाले की, “महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत. हे प्रकरण अत्यंत धक्कादायक असून चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषीला पाठीशी घातले जाणार नाही.” या विधानानंतर आता कारंडे यांचे पद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलीस कारवाई आणि पुढील तपास
पीडित महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) सह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर संशयित आरोपी विजय कारंडे फरार झाला असून, पुणे पोलीस त्याचे धागेदोरे शोधत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!