Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Beed Land Acquisition Scam: बीड भूसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक; SIT ची मोठी कारवाई

Beed Land Acquisition Scam: बीड भूसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक; SIT ची मोठी कारवाई

Beed Land Acquisition Scam: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन घोटाळ्यात अखेर सर्वात मोठी कारवाई झाली आहे. या कथित कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूर येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दिवसभराच्या चौकशीनंतर अटक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीने शुक्रवारी अविनाश पाठक यांची दिवसभर कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आणि तपासात सबळ पुरावे समोर आल्याने, पथकाने त्यांना लातूरमधून ताब्यात घेतले. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या अटकेच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

नेमका घोटाळा काय आहे?
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या जमिनीच्या संपादनात आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात (मावेजा) मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच १० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता, ज्यात पाठक यांचेही नाव होते. सुरुवातीला पोलीस उपाधीक्षक पूजा पवार या प्रकरणाचा तपास करत होत्या, मात्र त्या रजेवर असल्याने सध्या एम. व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीने ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

प्रशासकीय वर्तुळात दहशतीचे वातावरण
एका जिल्हाधिकारी दर्जाच्या आयएएस (IAS) दर्जाच्या अधिकाऱ्याला थेट घरून अटक झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. भूसंपादनाच्या नावाखाली झालेल्या या लुटीत अजून कोणाकोणाचे हात गुंतलेले आहेत, याची माहिती आता पाठक यांच्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे. अटक केलेल्या पाठक यांना लवकरच बीड न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!