Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

SSC Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींनीच मारली बाजी; कोकण पुन्हा अव्वल

SSC Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींनीच मारली बाजी; कोकण पुन्हा अव्वल

SSC Result 2026 : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला असून यंदा एकूण ९२.०९ टक्के निकाल लागला आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून अनेक ठिकाणी जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत ९७.६२ टक्के निकालाची नोंद केली आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा लागला आहे.

विशेष म्हणजे, यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत बाजी मारली आहे. राज्यभरातील निकालात मुलींची टक्केवारी अधिक राहिली असून त्यांनी सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे.

याशिवाय ६४ विषयांच्या परीक्षांपैकी तब्बल २० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीचे कौतुक होत आहे.

निकाल जाहीर होताच विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता वाढली असून पुढील प्रवेशप्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!