पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगारही मिळू शकतो.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे सहाय्यक महाव्यवस्थापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत १५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक महाव्यवस्थापक
– एकूण रिक्त पदे : 15 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : रु. १,२०,९४०/- ते रु. १,३५,०२०/- प्रति महिना..
– वयोमर्यादा : ३३ ते ४५ वर्षे
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मे २०२६.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.centralbankofindia.co.in अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


