Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vikas Lawande Attack: विकास लवांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! संग्राम भंडारेसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल

Vikas Lawande Attack: विकास लवांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! संग्राम भंडारेसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल

Vikas Lawande Attack: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपी संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह १० ते १२ अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केवळ शाईफेकच नाही, तर बंदुकीचा धाक दाखवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांच्यावर शस्त्र कायद्यांतर्गत (Arms Act) कारवाई केली आहे.

नेमकी तक्रार काय?
विकास लवांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला पूर्वनियोजित होता. लोणी काळभोर जवळील एका गावात प्रवचन सेवा संपवून पुण्याकडे परतत असताना, ३-४ गाड्यांनी लवांडे यांचे वाहन निर्जन स्थळी अडवले. हल्लेखोरांनी त्यांना बळजबरीने गाडीतून उतरवून स्मशानभूमीजवळ नेले. लवांडे यांचा आरोप आहे की, आरोपींनी त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवून “तुझा खात्मा करू” अशी धमकी दिली. “आमच्या गुरूबद्दल का बोलतोस?” असे म्हणत संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्या साथीदारांनी लवांडे यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या ओतल्या.

पोलिसांची भूमिका आणि कारवाई
पोलीस उपायुक्त सागर कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आणि लवांडे यांची फिर्याद यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेसह १९५९ च्या शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या चेहऱ्यांची ओळख पटवून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. संरक्षणाची मागणी केली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आळंदीत संतापाची लाट; राजकीय निषेध
या घटनेचे पडसाद तीर्थक्षेत्र आळंदीतही उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विलास कुराडे, काँग्रेसचे संदीप नाईकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी आळंदीत एकत्र येऊन या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. वारकरी संप्रदायातूनही अशा हिंसक प्रवृत्तींविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!