Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashtavinayak Temples: अष्टविनायक भक्तांनो लक्ष द्या! उद्यापासून ‘ही’ ३ मंदिरे महिनाभर बंद; दर्शनापूर्वी वाचा ही महत्त्वाची अपडेट

Ashtavinayak Temples: अष्टविनायक भक्तांनो लक्ष द्या! उद्यापासून ‘ही’ ३ मंदिरे महिनाभर बंद; दर्शनापूर्वी वाचा ही महत्त्वाची अपडेट

Ashtavinayak Temples: अष्टविनायक तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या ‘अष्टविनायक विकास आराखड्या’ अंतर्गत सुरू असलेल्या जीर्णोद्धार आणि संवर्धनाच्या कामासाठी १० मे ते ९ जून २०२६ या कालावधीत ३ प्रमुख मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये मोरगावचा मयुरेश्वर, थेऊरचा चिंतामणी आणि सिद्धटेकचा सिद्धिविनायक या मंदिरांचा समावेश आहे.

का घेतला हा मोठा निर्णय?
अष्टविनायक मंदिरांचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागामार्फत विशेष मोहीम राबवली जात आहे. या मंदिरांना त्यांचे मूळ सुबक दगडी स्वरूप पुन्हा मिळवून देण्यासाठी मुख्य गाभारा आणि सभामंडपात दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या कामात भाविकांच्या गर्दीमुळे अडथळा येऊ नये आणि काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी ही मंदिरे ३० दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाचे अधिकृत आदेश
पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त यांनी पुरातत्त्व विभाग, चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पुजारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केल्यानंतर ७ मे रोजी हे आदेश जारी केले. चिंचवड देवस्थान ट्रस्टने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून ८ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत स्थानिकांनाही याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

भाविकांसाठी नियमावली:
मंदिरे बंद असलेल्या एक महिन्याच्या काळात खालील व्यवस्था असेल:

  • नित्य विधी सुरू: भाविकांसाठी दर्शन बंद असले तरी, गणपती बाप्पाची नित्य पूजा, अभिषेक आणि इतर पारंपारिक धार्मिक विधी पुजाऱ्यांमार्फत नियमित सुरू राहतील.
  • दर्शनावर बंदी: १० मे पासून ९ जूनपर्यंत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही.
  • प्रवेश मर्यादा: मंदिर परिसरात केवळ अधिकृत पुजारी, बांधकामाशी संबंधित कामगार, अधिकारी आणि ट्रस्टचे विश्वस्त यांनाच प्रवेश दिला जाईल.
Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!