Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Weather News : राज्यात हवामानाचा डबल अटॅक! मुंबईत उष्णतेचा यलो अलर्ट, तर ‘या’ भागांत वादळी पावसाचा इशारा

Weather News : राज्यात हवामानाचा डबल अटॅक! मुंबईत उष्णतेचा यलो अलर्ट, तर ‘या’ भागांत वादळी पावसाचा इशारा

Weather News : महाराष्ट्रात सध्या हवामानाचा विचित्र खेळ सुरू असून नागरिकांना उकाडा आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी जोरदार वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे शेतीपिकांनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका कायम राहणार आहे. दिवसभर तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असून सकाळी आणि संध्याकाळी काही प्रमाणात गारवा जाणवू शकतो. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!