Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News : पुण्यात छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह 5 जणांवर गुन्हा

Pune News : पुण्यात छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह 5 जणांवर गुन्हा

Pune News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत महिलेचं नाव गोकुळा पांडुरंग मेरगळ (वय 41) असं आहे. त्यांचा विवाह जुलै 2023 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच पतीकडून आणि सासरच्या मंडळींकडून छळ सुरू झाल्याचा आरोप आहे.

फिर्यादीनुसार, पती किरकोळ कारणांवरून मारहाण करत असे. “तू रोगीट आणि मनोरुग्ण आहेस, तुझा खर्च मला झेपत नाही, माहेरून पैसे आण,” असे टोमणे मारून तिला त्रास दिला जात होता. तसेच गर्भधारणा होऊ नये म्हणून जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या सततच्या छळाला कंटाळून गोकुळा यांनी शनिवारी पहाटे राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!