Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Heatwave: महाराष्ट्र तापणार! पुढील 3 दिवस ‘हिटवेव्ह’चा इशारा; विदर्भासह मराठवाड्यात सुर्य आग ओकणार

Maharashtra Heatwave: महाराष्ट्र तापणार! पुढील 3 दिवस ‘हिटवेव्ह’चा इशारा; विदर्भासह मराठवाड्यात सुर्य आग ओकणार

Maharashtra Heatwave: राज्यात उन्हाचा कडाका आता असह्य होऊ लागला असून हवामान विभागाने पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता असून, पुणे हवामान विभागाने अनेक भागांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा विक्रमी पातळी गाठण्याची चिन्हे आहेत.

पारा ४६ अंशांच्या पार जाण्याची भीती
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात उष्णतेच्या लाटेसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव ओसरल्याने उत्तरेकडून येणाऱ्या तप्त वाऱ्यांमुळे तापमानात ४ ते ६ अंशांची वाढ होऊ शकते. यामुळे अकोला, अमरावती आणि चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

पुढील ५ दिवस पावसाची विश्रांती
नागरिकांना उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, येत्या ५ दिवसात पावसाची कोणतीही शक्यता नाही. परिणामी, लख्ख सूर्यप्रकाश आणि कोरड्या हवामानामुळे उष्माघाताचा (Sunstroke) धोका वाढला आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात ही उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार आहे.

विदर्भातील प्रमुख शहरांमधील सद्य तापमान (अंश सेल्सिअसमध्ये):

  • अकोला: 44.9
  • अमरावती: 44.6
  • वर्धा: 43.2
  • बुलढाणा: 42.6
  • नागपूर / ब्रम्हपुरी: 42.2
  • चंद्रपूर: 42.0
  • गडचिरोली: 41.2
  • गोंदिया: 40.4

आरोग्य विभागाचे आवाहन: ‘ही’ काळजी घ्या
वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत:

  • दुपारी बाहेर पडणे टाळा: सकाळी 12 ते दुपारी 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका.
  • जलसंजीवन: सतत पाणी प्या, लिंबू पाणी, ताक किंवा ओआरएस (ORS) चा वापर करा.
  • पोशाख: हलक्या रंगाचे आणि सुती कपडे वापरा. बाहेर जाताना डोके झाकून ठेवा.
  • आहार: तेलकट पदार्थांऐवजी हलका आणि पचायला सोपा आहार घ्या.
Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!