Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Satara Boat Accident : कोयनेच्या शिवसागर जलाशयात वादळी वाऱ्यामुळे बोट उलटली; मुंबईचे पर्यटक…

Satara Boat Accident : कोयनेच्या शिवसागर जलाशयात वादळी वाऱ्यामुळे बोट उलटली; मुंबईचे पर्यटक…

Satara Boat Accident : सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेल्या बामणोली परिसरात बुधवारी सायंकाळी निसर्गाच्या कोपाने एका आनंदी सहलीचे रूपांतर भीषण दुर्घटनेत झाले. महाबळेश्वर तालुक्यातील शिवसागर जलाशयात पर्यटकांना घेऊन जाणारी बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उलटली. या अपघातात मुंबईहून आलेले दोन पर्यटक सुदैवाने पोहत काठावर आले, मात्र बोटचालक पाण्याचा प्रवाहात बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

सोसाट्याचा वारा ठरला ‘काळ’
काल सायंकाळी सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. महाबळेश्वरच्या तापोळा-बामणोली पट्ट्यातही अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे जलाशयातील लाटा उसळू लागल्या. यावेळी शिवसागर बोट क्लबची एक बोट मुंबईच्या दोन पर्यटकांना जलविहारासाठी घेऊन जात होती. सावरी गावच्या हद्दीत नवीन पुलाजवळ ही बोट वाऱ्याचा वेग सहन न झाल्याने पाण्यात उलटली.

पर्यटकांची मृत्यूशी झुंज यशस्वी, चालक अद्याप बेपत्ता
बोट उलटल्यानंतर जीवाची पर्वा न करता दोन्ही पर्यटकांनी जलाशयाच्या संथ पाण्यात पोहत किनारा गाठला आणि आपला जीव वाचवला. मात्र, बोटचालक रुपेश धोंडीबा तांबे हा अद्याप सापडलेला नाही. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलिसांनी धाव घेतली असून शिवसागर बोट क्लबच्या सदस्यांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.

दोन वर्षांनंतर पुन्हा त्याच आठवणी ताज्या
कोयना धरणाच्या जलाशयातील ही पहिलीच घटना नाही. बरोबर दोन वर्षांपूर्वी तेटली गावाजवळ अशाच प्रकारे वादळी वाऱ्यामुळे स्पीड बोट बुडाली होती, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. कालच्या घटनेने या जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या असून जल पर्यटनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!