HSRP Number Plate : राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या मुदतीत राज्य सरकारने वाढ केली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आता वाहनधारकांना ३० जून २०२६ पर्यंत HSRP प्लेट बसवण्याची संधी मिळणार आहे.
यापूर्वी सरकारने ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित केली होती. मात्र, वाढती गर्दी, अपॉइंटमेंट मिळण्यात होणारा विलंब आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन शासनाने वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे.
१ जुलै २०२६ पासून नियम कडक
सरकारने स्पष्ट केले आहे की, १ जुलै २०२६ नंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई केली जाईल. मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे.
HSRP प्लेटचे फायदे काय?
- विशेष लेझर कोड
- क्रोमियम बेस्ड हॉट स्टॅम्पिंग
- छेडछाड न करता येणारी रचना
असल्यामुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि अचूक होते. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारीत वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची मानली जाते.
वाहनधारकांनी HSRP बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अपॉइंटमेंट बुक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही अनधिकृत एजंटांच्या आमिषाला बळी पडू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


