Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Petrol-Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले; तुमच्या शहरातील दर काय? घ्या जाणून…

Petrol-Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले; तुमच्या शहरातील दर काय? घ्या जाणून…

Petrol-Diesel Prices : देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि सीएनजी दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलचे दरही वाढले आहेत. तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे ३ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर शंभरीपार गेले आहेत.

मुंबईत पेट्रोलच्या दरात ३.१४ रुपयांची वाढ झाली असून आता पेट्रोल १०६.६८ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डिझेल ३.११ रुपयांनी महागून ९३.१४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

प्रमुख शहरांतील नवीन इंधन दर

  • मुंबई : पेट्रोल 106.68, डिझेल ₹93.14
  • नाशिक : पेट्रोल 107.93, डिझेल ₹94.41
  • दिल्ली : पेट्रोल 97.77, डिझेल ₹90.67
  • कोलकाता : पेट्रोल 108.74, डिझेल ₹95.13
  • चेन्नई : पेट्रोल 103.67, डिझेल ₹95.25

याशिवाय पुणे, ठाणे, परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर आणि नागपूरमध्येही इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, अमेरिका-इराण संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, केंद्र सरकारने देशात इंधन टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. Neeraj Mittal यांनी अलीकडेच सांगितले की, देशाकडे सध्या सुमारे ६० दिवसांचा इंधन साठा आणि ४५ दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचे रेशनिंग लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!