Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Silver Bricks Van Overturn: 17 कोटींच्या विटा घेऊन जाणारी व्हॅन पलटली; लोकांनी थेट….

Silver Bricks Van Overturn: 17 कोटींच्या विटा घेऊन जाणारी व्हॅन पलटली; लोकांनी थेट….

Silver Bricks Van Overturn: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज एका भीषण अपघाताने खळबळ उडवून दिली. तब्बल ६०० किलो चांदीच्या विटांची वाहतूक करणारी एक व्हॅन चारोटी उड्डाणपुलावर नियंत्रण सुटल्याने उलटली. या व्हॅनमध्ये असलेल्या चांदीची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे १७ कोटी ६६ लाख रुपये इतकी असून, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला आहे.

नेमकी घटना काय?
मुंबईतील नामांकित ‘नाकोडा बुलियन’ कंपनीकडून चांदीच्या विटांचा मोठा साठा गुजरातच्या दिशेने पाठवण्यात येत होता. वापी (जीआयडीसी) येथील ‘मोदी सन्स लिमिटेड’कडे ही चांदी पोहोचवली जाणार होती. मात्र, चारोटी उड्डाणपुलावर पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही मौल्यवान साठा वाहून नेणारी व्हॅन पलटी झाली. सुदैवाने, या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
अपघातग्रस्त व्हॅनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर चांदी असल्याचे समजताच पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. कासा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चांदीच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला.

वाहतुकीवर परिणाम
ऐन महामार्गावर आणि तेही उड्डाणपुलावर हा अपघात झाल्याने मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले, मात्र पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने वाहन बाजूला करून रस्ता मोकळा केला आहे. सध्या ही चांदी सुरक्षित असून कासा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडलेले असताना झालेल्या या ‘मौल्यवान’ अपघाताची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!