Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai-Pune Expressway Accident: मनसेला मोठा धक्का! राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचा भीषण अपघात; प्रकृती चिंताजनक

Mumbai-Pune Expressway Accident: मनसेला मोठा धक्का! राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचा भीषण अपघात; प्रकृती चिंताजनक

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप धोत्रे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात धोत्रे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

गाडीचा चक्काचूर; भीषण धडक
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप धोत्रे हे आपल्या खाजगी वाहनाने मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होते. प्रवास सुरू असतानाच त्यांच्या वाहनाला एका भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की धोत्रे यांच्या कारचा पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या अपघातात त्यांच्या छातीला आणि पायाला गंभीर इजा झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याचे समजते.

अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाचे नियंत्रण सुटल्याने, याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, वेगावर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले आणि धोत्रे यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयात हलवले.

कार्यकर्त्यांची पुण्याकडे धाव
धोत्रे यांच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पंढरपूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुण्यातील रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!