Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shirdi Defense Hub: साईनगरीत आता घुमणार क्षेपणास्त्रांचा आवाज; संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते होणार 17 कोटींच्या बॉम्ब-रॉकेट निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण

Shirdi Defense Hub: साईनगरीत आता घुमणार क्षेपणास्त्रांचा आवाज; संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते होणार 17 कोटींच्या बॉम्ब-रॉकेट निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण

Shirdi Defense Hub: भक्ती आणि अध्यात्माची नगरी म्हणून जगभर कीर्ती असलेल्या शिर्डीची ओळख आता बदलणार आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला मूर्त रूप देत, शिर्डीत देशातील सर्वात मोठा खासगी संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्प दिमाखात उभा राहिला आहे. यामुळे आता साईनगरीच्या पवित्र मातीत भारतीय लष्कराची ताकद वाढवणारे रॉकेट लाँचर आणि बॉम्ब तयार होणार आहेत.

वर्षाला ५ लाख बॉम्ब निर्मिती
‘निबे ग्रुप’च्या पुढाकाराने अवघ्या 1 वर्षाच्या विक्रमी कालावधीत 200 एकर परिसरात हा महाप्रकल्प साकारला आहे. या कारखान्याची क्षमता वर्षाकाठी तब्बल 5 लाख बॉम्ब शेल्स उत्पादित करण्याची आहे. केवळ भारताचीच नव्हे, तर जगाची गरज भागवण्यासाठी येथून निर्यात केली जाणार असून, अनेक परदेशी राष्ट्रांनी या शस्त्रास्त्रांसाठी आधीच बुकिंग केले आहे.

संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक सोहळा
येत्या 23 मे रोजी या प्रकल्पाचे भव्य लोकार्पण देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पार पडणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (CDS) जनरल अनिल चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!