Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

स्वामींची जादू कायम..! बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंचा डंका; ‘देऊळ बंद 2’ची छप्परफाड कमाई

स्वामींची जादू कायम..! बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंचा डंका; ‘देऊळ बंद 2’ची छप्परफाड कमाई

Deool Band 2 Collection : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून महाराष्ट्रभर चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वामीभक्ती, अध्यात्म आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या 10 दिवसांत कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडलाही अनेक ठिकाणी हाऊसफुल शोचा मान मिळवला आहे. प्रभावी कथा, संवाद आणि सामाजिक संदेश यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र दिसत आहे.

Sacnilk च्या अहवालानुसार, ‘देऊळ बंद 2’ने दहाव्या दिवशी 1,941 शोमधून तब्बल 5 कोटी रुपयांची नेट कमाई केली. यासह चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन 38.30 कोटी रुपयांवर पोहोचले असून, भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन 45.05 कोटी रुपयांपर्यंत गेले आहे.

‘देऊळ बंद 2’ची दिवसनिहाय कमाई (नेट कलेक्शन)

दिवस 1 : ₹3.05 कोटी
दिवस 2 : ₹3.11 कोटी
दिवस 3 : ₹5.21 कोटी
दिवस 4 : ₹6.10 कोटी
दिवस 5 : ₹3.70 कोटी
दिवस 6 : ₹3.35 कोटी
दिवस 7 : ₹3.60 कोटी
दिवस 8 : ₹4.55 कोटी
दिवस 9 : ₹3.10 कोटी
दिवस 10 : ₹5.00 कोटी

एकूण नेट कलेक्शन : ₹38.30 कोटी

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा हा सीक्वल असून, शेतकरी आत्महत्या आणि शेतीतील बदलत्या आव्हानांवर भाष्य करणारा महत्त्वपूर्ण संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. आत्महत्या हा प्रश्नांचा मार्ग नसून आधुनिक शेती आणि सकारात्मक दृष्टिकोनातून संकटांवर मात करता येते, हा संदेश चित्रपट मांडतो.

चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली असून अभिनेत्री स्नेहल तरडे महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. या दोघांच्या अभिनयालाही प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!