Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! आयसीएमआर येथे नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

Job Alert ! आयसीएमआर येथे नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आयसीएमआर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन विमेन्स हेल्थ, मुंबई येथे प्रकल्प संशोधन वैज्ञानिक II (गैर-वैद्यकीय), प्रकल्प संशोधन वैज्ञानिक I (गैर-वैद्यकीय) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. १० जून २०२६  ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.nirrh.res.in/  या  अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : प्रकल्प संशोधन वैज्ञानिक II (गैर-वैद्यकीय), प्रकल्प संशोधन वैज्ञानिक I (गैर-वैद्यकीय)

– एकूण रिक्त पदे : 03 पदे.

– नोकरीचे ठिकाण : मुंबई.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जून २०२६

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!