Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

SP Tushar Patil : पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचे अवघ्या 45 व्या वर्षी निधन; महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा

SP Tushar Patil : पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचे अवघ्या 45 व्या वर्षी निधन; महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा

SP Tushar Patil Death : महाराष्ट्र पोलीस दलासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) गट-5, दौंडचे समादेशक तथा पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचे अवघ्या 45 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत असून सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने तुषार पाटील यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी किडनी दान करून मुलाला नवजीवन दिले होते. मात्र अलीकडे पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तुषार पाटील यांनी पोलीस सेवेत विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत उल्लेखनीय योगदान दिले. कोल्हापूर येथील नागरी हक्क संरक्षण विभागाच्या अधीक्षक पदावरून त्यांची दौंड येथील एसआरपीएफ गट-5 मध्ये समादेशक तथा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

यापूर्वी त्यांनी कोल्हापूर, रत्नागिरी आणि मुंबई येथे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे लोहमार्ग पोलीस दलातही त्यांनी सेवा बजावली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.

दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर जळगाव जिल्ह्यातील मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलाने एक कर्तव्यदक्ष आणि अनुभवी अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!