Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शिर्डीत साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ; भेसळयुक्त पेढ्यांच्या तक्रारीनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये

शिर्डीत साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ; भेसळयुक्त पेढ्यांच्या तक्रारीनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये

Tukaram Mundhe : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांच्या आरोग्याशी अक्षम्य खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंदिर परिसरातील खाजगी दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढ्यांना चक्क बुरशी लागल्याच्या तक्रारी भाविकांनी केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रसादाच्या पाकिटांवर तो कधी तयार केला, त्याची अंतिम मुदत (एक्सपायरी डेट) काय आहे, किंवा हा पेढा कोणी उत्पादित केला, याबद्दलची कोणतीही कायदेशीर माहिती छापलेली नाही. अनेक वर्षांपासून अत्यंत निकृष्ट आणि दगडासारख्या कडक प्रसादाची विक्री उघडपणे सुरू होती. या गंभीर प्रकाराकडे स्थानिक नगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) दीर्घकाळापासून दुर्लक्ष झाल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

एफडीए पथकाची शिर्डीत धडक छापेमारी
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेताच डॅशिंग सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. शिर्डीतील या गैरप्रकाराचे वृत्त समोर येताच मुंढे यांच्या आदेशानुसार एफडीएचे विशेष पथक तातडीने शिर्डीत दाखल झाले. पथकाने पाऊल ठेवताच मंदिर परिसरातील पेढ्यांच्या दुकानांवर एकाच वेळी छापे टाकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे शिर्डीतील भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पेढ्यांचे नमुने जप्त; दोषी उत्पादकांवर होणार फौजदारी कारवाई
प्रशासनाच्या पथकाने कारवाईदरम्यान संशयास्पद पेढ्यांचे साठे जप्त करून त्याचे नमुने प्रयोगशाळेत (लॅब) तपासणीसाठी पाठवले आहेत. यासोबतच, हे पेढे पुरवणाऱ्या मुख्य कारखानदारांचा आणि उत्पादकांचा शोध घेण्यासाठी विक्रेत्यांकडे कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. लॅब अहवालात प्रसादाचा दर्जा निकृष्ट किंवा आरोग्यासाठी घातक आढळल्यास, संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांवर कायद्यानुसार कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!