Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे मेट्रो स्थानकांजवळ प्रवाशांची उघड लूट; पुण्याच्या वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी सुरू झालेल्या मेट्रोबाहेर नेमकं काय घडतंय?

पुणे मेट्रो स्थानकांजवळ प्रवाशांची उघड लूट; पुण्याच्या वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी सुरू झालेल्या मेट्रोबाहेर नेमकं काय घडतंय?

Pune News: पुणेकरांचा प्रवास वेगवान व सुकर व्हावा या उद्देशाने मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. मेट्रोच्या आतला प्रवास जितका आरामदायी आहे, तितकाच स्थानकाबाहेर पडल्यानंतरचा प्रवास नरकयातना देणारा ठरत आहे. शहरातील प्रमुख मेट्रो स्टेशनखाली रिक्षा आणि कॅबचालकांनी मांडलेला उच्छाद, बेकायदेशीर दुहेरी पार्किंग (डबल पार्किंग) आणि प्रवाशांची होणारी अडवणूक यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, वाहतूक पोलीस आणि आरटीओ (RTO) प्रशासन या गंभीर समस्येकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे.

सध्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गांवर मेट्रो धावत आहे. मात्र, पुणे स्टेशन, रुबी हॉल क्लिनिक आणि आरटीओ यांसारख्या प्रमुख स्थानकांभोवती रिक्षा व कॅबचालकांनी बेकायदेशीर ताबा मिळवला आहे. या ठिकाणी वाहनांच्या दुहेरी रांगा लावल्या जात असल्याने रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांना आणि इतर वाहनधारकांना तासन्तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर, या बेशिस्तीमुळे ‘पीएमपी’ (PMPML) बस चालकांना स्थानकाजवळ बस उभी करणे अशक्य झाले असून, त्यांना बस दूर थांबवावी लागत आहे.

रामवाडी स्थानकाबाहेर पोलिसांचा अजब कारभार; नागरिकांना पायपीट
रामवाडी मेट्रो स्टेशनबाहेर वाहतूक पोलिसांनी प्रवाशांची सोय करण्याऐवजी उलट त्रास वाढवणारा निर्णय घेतला आहे. मेट्रो स्थानकालगत असलेला पीएमपी बस थांबा वाहतूक कोंडीचे कारण पुढे करून २०० ते ३०० मीटर पुढे हलवण्यात आला आहे. परंतु, त्याच मेट्रो स्टेशनच्या खाली अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या आणि डबल पार्किंग करणाऱ्या रिक्षांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे मेट्रोतून उतरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना आणि लहान मुलांना भर उन्हात किंवा पावसात बस पकडण्यासाठी नाहक पायपीट करावी लागत आहे.

कागदावरच राहिली ‘शेअर रिक्षा’ योजना
मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी आरटीओ प्रशासनाने ‘शेअर रिक्षा’ मार्ग आणि त्याचे भाडे निश्चित केले होते. स्थानकांवर याचे छोटे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, ही योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिली असून, प्रत्यक्ष जमिनीवर एकही रिक्षाचालक या ठरवून दिलेल्या दराचा नियम पाळत नाही. मीटरप्रमाणे येण्यास स्पष्ट नकार देत प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल केले जात असून, मेट्रो स्थानकाबाहेर प्रवाशांची उघडपणे आर्थिक लूट सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!