Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News : ‘ऑपरेशन ट्रान्सफर’ला सुरुवात! पुण्यात महसूल विभागातील २८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; वर्षानुवर्षे एकाच जागी असलेल्यांना धक्का

Pune News : ‘ऑपरेशन ट्रान्सफर’ला सुरुवात! पुण्यात महसूल विभागातील २८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; वर्षानुवर्षे एकाच जागी असलेल्यांना धक्का

Pune News : पुणे जिल्हा प्रशासनाने महसूल विभागात मोठी खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील तब्बल २८५ महसूल कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया आज (सोमवारी) पार पडत आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे.

या बदल्यांमध्ये १०७ ग्राम महसूल अधिकारी, ३४ मंडळ अधिकारी, ५७ सहाय्यक महसूल अधिकारी आणि ८७ महसूल सहाय्यकांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात समुपदेशन प्रक्रियेद्वारे पदस्थापना करण्यात येत असून, कर्मचाऱ्यांची पात्रता, अनुभव आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन नियुक्त्या निश्चित केल्या जाणार आहेत.

महसूल विभागातील बदली प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने राबवली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव, शिफारस किंवा बाह्य हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले की, शासनाच्या नियमानुसारच सर्व बदल्या केल्या जात आहेत. बदली प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कारवाई केली जाईल. तसेच समुपदेशन प्रक्रियेस अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय सोयीनुसार रिक्त पदांवर थेट नियुक्ती केली जाईल.

जिल्ह्यात मंजूर असलेल्या ९२९ ग्राम महसूल अधिकारी पदांपैकी सध्या ८८२ पदे कार्यरत आहेत. त्यापैकी १०७ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याने महसूल विभागात मोठे फेरबदल होणार असून, प्रशासनाच्या या निर्णयाची जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!