Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा पहिला राजकीय मास्टरस्ट्रोक? काँग्रेस-राष्ट्रवादीचे 10 नगरसेवकांचा पक्षप्रवेश

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा पहिला राजकीय मास्टरस्ट्रोक? काँग्रेस-राष्ट्रवादीचे 10 नगरसेवकांचा पक्षप्रवेश

अकोला : राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ची पहिली झलक अकोला जिल्ह्यात पाहायला मिळाली आहे. बार्शीटाकळी नगरपंचायतीतील तब्बल 10 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे दोन आणि चार अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. या घडामोडीनंतर बार्शीटाकळी नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून नगरपंचायतीत सत्तांतराच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये अपक्ष गटातील शुभम इंगळे, नवेद खान, इफ्तेखारुद्दीन काझी आणि शहाना अंजुम यांचा समावेश आहे. तर काँग्रेसच्या रफिया खान, मुमताज सिद्दीक, सय्यद जहागीर, आसगिरी अंजुम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या रुबिना परवीन व सफिया बेगम यांनीही शिवसेनेची वाट धरली.

दरम्यान, अकोट नगरपालिकेतील 15 हून अधिक नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काही मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये वर्धापन दिनानिमित्त मोठे शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. पक्षाच्या आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना यासाठी विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!