Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे हादरले! किरकोळ वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, त्यानंतर स्वतःही केली आत्महत्या

पुणे हादरले! किरकोळ वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, त्यानंतर स्वतःही केली आत्महत्या

खेड (पुणे) : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेलूगाव (ठाकरवस्ती) येथे एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नेमकी घटना काय?

शेलूगाव येथील ठाकरवस्ती येथे राहणारे पती-पत्नी, नवनाथ खेमा केदारी आणि पिनाबाई रामदास केदारी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात नवनाथ केदारी याने आपली पत्नी पिनाबाई हिचे डोके जमिनीवर जोराने आपटले, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर नवनाथ याने त्याच घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

या घटनेची माहिती मिळताच महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दादाभाऊ बिराजी कडाळे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन महाडिक अधिक तपास करत आहेत.

ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुहेरी मृत्यूच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!