Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पनवेलमध्ये संतप्त पित्याचे मुलाच्या गळ्यावर ब्लेडने वार

पनवेलमध्ये संतप्त पित्याचे मुलाच्या गळ्यावर ब्लेडने वार

पनवेल : दारूच्या नशेत आई-वडिलांशी सतत भांडण करणाऱ्या मुलाच्या गळ्यावर त्याच्या वडिलांनी रागाच्या भरात ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कामोठेत घडली आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर कामोठे पोलिसांनी मुलावर हल्ला करणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अमोल जाधव (३३) असे मुलाचे नाव असून, त्याच्यावर ब्लेडने वार करणाऱ्या त्याच्या पित्याचे नाव रवींद्र जाधव (६८) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल याला दारूचे गंभीर व्यसन जडल्याने तो दररोज दारू पिऊन घरात आई-वडिलांशी भांडण काढत होता. तसेच त्यांना मारहाणही करीत होता. त्यामुळे त्याच्या त्रासाला त्याचे आई-वडील कंटाळले होते. वडील जाधव हे रात्री वॉचमन म्हणून काम करतात. ते रविवारी रात्रीपाळी. करून सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घरी आले होते. या वेळी त्यांची पत्नी घरकामासाठी निघून गेली. तर, अमोल पलंगावर झोपला होता.

दरम्यान रवींद्र हे जेवण घेण्यासाठी किचनमध्ये गेले असता, भांड्यांचा आवाज झाल्याने अमोल जागा झाला. त्यावर दारूच्या नशेत असलेल्या अमोल याने रवींद्र यांना घरातून निघून जा, असे जोरजारात सांगून त्यांना शिवीगाळ करू लागला.

त्यानंतर त्याने रवींद्र यांना मारहाणही केली. या वेळी मी घराचे भाडे भरतोय, तूच घराबाहेर जा, असे रवींद्र यांनी अमोलला बजावले. त्यामुळे चिडलेल्या अमोलने त्यांना पुन्हा मारहाण सुरू केली. त्यामुळे चिडलेल्या रवींद्र यांनी मागचापुढचा कसलाच विचार न करता घरातील दाढी करण्याचे ब्लेड उचलले व अमोलच्या गळ्भावर वार करून त्याला जखमी केले. या घटनेत अमोल गंभीर जखमी झाल्याने त्याला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी रवींद्र यांच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!