Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मंडल अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच घेताना अटक; एमआयडीसी भोसरी येथे एसीबीचे कारवाई

मंडल अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच घेताना अटक; एमआयडीसी भोसरी येथे एसीबीचे कारवाई

पिंपरी: वादग्रस्त जमिनीत नवीन झालेला फेरफार रद्द करण्यासाठी तसेच जमीन नावावर करून देण्यासाठी मावळ तालुक्यातील शिवणे येथील मंडल अधिकाऱ्याने दोन लाख १० हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवणे मंडल अधिकाऱ्याला आणि त्याच्या एका साथीदाराला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पाईन रोडवर मंगळवारी (दि.१५) ही कारवाई करण्यात आली. मारुती महादेव चोरमले (वय ५३) असे अटक केलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह जयेश बाळासाहेब बारमुख (वय ३३, रा.चांदखेड, मावळ) यालाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे.

एसीबीचे सहायक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांनी मिळून सन २०१८ व २०१९ मध्ये बांधकाम व्यावसायिक पूर्णचंद्र सनातन स्वाईन यांना एक कोटी ९० लाख रुपये देऊन त्यांच्याकडून कुसगाव मावळ येथील ३८ गुंठे जमीन विकसन करारनामा करून घेतली आहे. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक स्वाईन यांनी तीच जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली. त्या जागेचे खरेदीखत झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयात अर्ज केला. तलाठ्याने त्या व्यक्तीचा फेरफार नोंद करून तो मंजुरीसाठी मंडल अधिकारी मारुती चोरमले याच्याकडे पाठवला.

संबंधित फेरफार मंजूर न होण्यासाठी तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांनी हरकत घेतली. त्याप्रमाणे मंडल अधिकारी चोरमले याने हरकत अर्जावर सुनावणी सुरु केली. दरम्यान, तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांनी तक्रारदार यांना या प्रकरणाचे अधिकारपत्र दिले. त्यानुसार तक्रारदार हरकतीच्या प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहत होते. नवीन झालेला फेरफार रद्द करण्यासाठी तसेच ३८ गुंठे वादग्रस्त जमीन तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांच्या नावावर होण्यास मदत करण्यासाठी मंडल अधिकारी चोरमले याने तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली. तसेच त्याचा सहकारी जयेश बारमुख याला भेटण्यास सांगितले. जयेश बारमुख याने मंडल अधिकाऱ्यासाठी दोन लाख रुपये आणि स्वतःसाठी दहा हजार रुपये लाच मागितली.

तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने १४ आणि १५ जुलै रोजी सापळा लावला. १५ जुलै रोजी एमआयडीसी भोसरी मधील स्पाईन रोड येथे एका रुग्णालयाच्या समोर आरोपींनी तक्रारदार यांना बोलावले. तिथे मंडल अधिकारी चोरमले याने दोन लाख रुपये रोख स्वरूपात तर जयेश बारमुख याने १० हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून लाच घेतली. लाच घेत असताना एसीबीने दोघांना रंगेहाथ पकडले. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!